Vedic Maths
वैदिक गणित "वैदिक गणितामध्ये मानवी मन कस काम करत, याचा पूर्ण विचार केला आहे. यामुळे आकडेमोड सोपी आणि जलद तर होतेच, पण मनावर ताण न पडल्याने, ते सतत ताजेतवाने आणि कार्यक्षम राहते. आजच्या संगणकाच्या जमान्यात, हिंदुस्थानी गणितज्ञांनी, शेकडो वर्षपूर्वी, शोधून काढलेली हि पद्धत अधिक उठून दिसते." हे वक्तव्य , लंडनच्या सेंट इंडिपेंडन्ट स्कूल फॉर बॉईज चे शाळाप्रमुख निकोलस डेबनहम यांचे आहेत. अलीकडे काही वर्षात त्यांच्या संस्थेच्या सर्व शाळांत वैदिक गणित आणि त्यासाठी संस्कृत हा विषय अनिवार्य केला आहे. नामवंत पाश्च्यात्य शिक्षणतज्ञांची, त्यासाठी प्रशस्ती लाभली आहे. वैदिक गणित हा हिंदुस्थानी (भारतीय) संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. दुर्दैवाने, हिंदुस्तानात याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. पाश्च्यात्य देशात मात्र यावर अभ्यास व संशोधन सुरु आहे. वैदिक गणिताचे आपण जनक असूनही, आपल्याकडून उपेक्षा होते आहे. तोंडी गणिते सोडविण्यासाठी, हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व आय. आय. टी . आणि एम. बी. ए. ( I.I.T. & M.B.A. ) च्या विद्यार्थांनी, कॅलक्यूलेटर पे