Katyar Kaljat Ghusali - Shiv Bhola Bhandari - Kopeshwar Temple

शिव भोला भंडारी। शिव भोला भंडारी। .. 
कोपेश्वर शिव मंदिर - खिद्रापुर

Shiv Bhola Bhandari - YouTube

सुख का त्योहार, मिले डमरू का ताल करे दुःख का पीड़ा अपार जटा धारी 
शिव भोला भंडारी। .. शिव भोला भंडारी। ... 

गाण्याचे बोल आठवतात का ... ?? "कट्यार काळजात घुसली" या चित्रपटातील आर्जित सिंग यांनी गायलेले आणि सुबोध भावे, शंकर महादेवन सोबत मृण्मयी देशपांडे, शिवम् महादेवन वर चित्रित झालेले हे गाणे आपल्या मनात, हृदयात विराजमान झाले आहे. पण हे गाणे जिथे झाले आहे ते ठिकाण म्हणजे खिद्रापुर येथील कोपेश्वर शिव मंदिर.

Khidrapur Temple, Khidrapur - Temples in Kolhapur - Justdial

आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे मंदिर आहे कुठे। .?? तिथे जायचे कसे। .?? तिथे काय असे वेगळे आहे. अहो...  तेच तर सांगतोय. हे मंदिर कोल्हापुर जिल्ह्यात आहे. खिद्रापुर येथे, नरसोबाच्या वाडीवरून  येताना कुरुंदवाड मार्गे येथे जाता येते. साधारण १२ किमी आतमध्ये.

हे मंदिर म्हणजे शिलाहार - शिल्पस्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे. भारत सरकारचा पुरातत्व विभागाने या मंदिराला २ जानेवारी १९५४ रोजी राष्ट्रिय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. याचे बांधकाम सातव्या शतकात चालुक्य राजाच्या कारकिर्दीत करण्यात आले. मधल्या काळात याचे खुप नुकसान झाले, पण १२ व्या  शतकात सिलहर राजा गांधरादित्य याच्या आमदानित पुन्हा बांधण्यात आले. नंतर त्याचे पुनरुज्जीवन केले ते देवगिरी  यादवांनी. सर्व बांधकामावर बेलूर आणि हळेबिड येथील मंदिराच्या शिल्पकलेची छाप आहे. मुघल राजा - औरंगजेब आणि डेक्कन सुलतान यांनी या मंदिराची तोड़फोड़ केली. हे मंदिर जेव्हा आपण एक अभ्यसक नजरेने पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की या मंदिराच्या पाया जवळील भागावरील शिल्पकलेत हत्तीची डोकी आहेत. जणू काही या मंदिराचा भार आपल्या शिरावर या हत्तींनी आपल्या शिरावर घेतला आहे. पण  ह्या हत्तीच्या सोंडी तोडल्या आहेत. पण या मंदिराच्या वरच्या भागावर शिल्पकला बऱ्यापैकी शाबुत आहे.  हत्तीच्या पाठीवर वेगवेगळ्या देवतांची शिल्प आहेत.

Experience Poetry in Stone at Kopeshwar temple - All You Need to ...

शंकराच्या कुठल्याही मंदिरात गेलो तर मंदिरा बाहेर आपल्याला प्रथम नंदीचे दर्शन होते. पण इथे नंदीच नाही. आणि मंदिरातील गर्भगृहात शिवलिंग एक नसून दोन आहेत. एक शिवलिंग आहे ते विष्णुचे आणि दुसरे कोपेश्वराचे शिवलिंग.

पौराणिक कथेनुसार दक्ष ची कन्या सती हिने भगवान शंकराशी विवाह केला हे दक्ष ला आवडले नाही. त्याने जेव्हा यज्ञ केला तेव्हा त्याने भगवान शंकर आणि सती ला बोलवले नाही. ती  जेव्हा माहेरी आली तेव्हा दक्षला समजवण्याचा प्रयत्न नंदिने केला. पण दक्ष ने त्यांचा अपमान सर्व पाहुण्यांसमोर केला. त्याचवेळेला सती ने त्या यज्ञामध्ये उडी घेतली. हे जेव्हा भगवन शंकरला समजले त्यावेळेला अतिशय रागामध्ये  (कोपाने) असताना त्याने दक्ष याचे मुंडके उडवले. भगवान शंकरला शांत करण्यासाठी भगवान विष्णु ला बोलवण्यात आले. तेच हे मंदिर म्हणजे खिद्रापुर चे कोपेश्वर मंदिर. राग शांत झाल्यावर सतीला त्याने यज्ञामधुन बाहेर काढले. व दक्षाला शेळीचे तोंड लावले. या प्रसंगामुळे सती नंदीवर बसून गेली. म्हणुन या मंदिरात नंदीची मूर्ती नाही. तसेच इथे या मंदिरात गर्भगृहात दोन लिंग आहेत एक शंकराचे आणि दुसरे विष्णुचे.

Kopeshwar Temple is at Khidrapur,... - Hinduism- The Greatest ...Stunning Architecture Of Kopeshwar Temple, Khidrapur | Inditales

कोपेश्वर मंदिर ४ भागात विभागले गेले आहे.
१. स्वर्ग मंडप
२.  सभा मंडप
३. अंतराळ
४. गर्भगृह

आणि हे चारही भाग देवड़ी (ओटीने) जोडलेली आहेत.

स्वर्गमंडप -
हा गोलाकार असून तो ४८ स्तंभावर उभा आहे. हे स्तंभ तीन वर्तुळात विभागले गेले आहे. पहिल्या वर्तुळात १२ स्तंभ, दुसऱ्या वर्तुळात १६ स्तंभ आणि तिसऱ्या वर्तुळात ८ स्तंभ असून त्याचे आकार चौकोनी, गोल,
षट्कोनी व् अष्टकोनी असून त्यावर देव देवतांची शिल्पे आहेत.

सभामंडप - उत्तर आणि दक्षिण दिशेल त्याचे द्वार आहे.

अंतराळ - 
मंडपातुन अंतराळात जाताना प्रवेश मार्गपाशी दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्ति आहेत.

गर्भगृह - 
याचे द्वार पंचशाखा प्रकारचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वर्ग मंडपाच्या मंडळाच्या छताला १३ फुट त्रिज्येचे मोठे छिद्र आहे. पौर्णिमेच्या रात्री जार आपण या छिद्रातून आकाशाकडे पाहिले तर स्वर्गाकडे जाण्याचे ते प्रवेश द्वार आहे असे वाटते. अतिशय विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते.

Kopeshwar Temple - Khidrapur - Picture of Kopeshwar Temple ...

मग कधी जाताय खिद्रापुरला !!! भगवन शंकराचे आणि विष्णुचे एकत्रित पणे दर्शन घ्यायला.

धन्यवाद

कुणाल सुतावणे
९८१९५०४०२०


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख