Vedic Maths
वैदिक गणित
"वैदिक गणितामध्ये मानवी मन कस काम करत, याचा पूर्ण विचार केला आहे. यामुळे आकडेमोड सोपी आणि जलद तर होतेच, पण मनावर ताण न पडल्याने, ते सतत ताजेतवाने आणि कार्यक्षम राहते. आजच्या संगणकाच्या जमान्यात, हिंदुस्थानी गणितज्ञांनी, शेकडो वर्षपूर्वी, शोधून काढलेली हि पद्धत अधिक उठून दिसते." हे वक्तव्य , लंडनच्या सेंट इंडिपेंडन्ट स्कूल फॉर बॉईज चे शाळाप्रमुख निकोलस डेबनहम यांचे आहेत.
अलीकडे काही वर्षात त्यांच्या संस्थेच्या सर्व शाळांत वैदिक गणित आणि त्यासाठी संस्कृत हा विषय अनिवार्य केला आहे. नामवंत पाश्च्यात्य शिक्षणतज्ञांची, त्यासाठी प्रशस्ती लाभली आहे.
वैदिक गणित हा हिंदुस्थानी (भारतीय) संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. दुर्दैवाने, हिंदुस्तानात याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. पाश्च्यात्य देशात मात्र यावर अभ्यास व संशोधन सुरु आहे. वैदिक गणिताचे आपण जनक असूनही, आपल्याकडून उपेक्षा होते आहे. तोंडी गणिते सोडविण्यासाठी, हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व आय. आय. टी . आणि एम. बी. ए. ( I.I.T. & M.B.A. ) च्या विद्यार्थांनी, कॅलक्यूलेटर पेक्षा, वैदिक गणिताची पद्धत सोपी आहे, हे मान्य केले आहे. ही पद्धत वापरल्याने वेळ, श्रम आणि शाई या सार्यांचीच बचत होते. तोंडी गणिते सोडविण्याची, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या अफाट असते. हे पाश्च्यात्य विद्यापीठांतून प्रशस्तिपत्रक मिळते, त्याच्या मुळाशी आपल्या पूर्वजांनी तयार केलेला वैदिक गणिताचा पाया आहे.
"श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी भारतीकृष्ण तीर्थ, यांच्याकडून आपल्याला हि वैदिक गणिताची देणगी मिळाली. " त्यांचे मूळ नाव वेंकटरमण. १९०२ साली बी. ए. आणि १९०४ साली "अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स तर्फे घेतली जाणारी, एम. ए. ची परीक्षा, त्यांनी मुंबई केंद्रातून दिली आणि ते त्या परीक्षेत, एकाचवेळी सहा विषयात सर्वप्रथम आले. हा विक्रम अजूनपर्यंत त्यांच्या नावावर आहे. त्यांनी "अथर्ववेदात" विखुरलेल्या गणिताच्या माहितीवर आधारित , वैदिक गणिताच्या १६ सूत्रांची आणि १३ उप-सूत्रांची रचना केली.
त्या सूत्रांचा जर आपण अभ्यास केला आणि त्याच्या वापर केला तर मोठमोठ्या संख्यांचा गुणाकार, एका ओळीत मांडू शकतो. एवढेच नाही तर अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, कॅलक्यूलस, कोनिक्स,खगोलशास्त्र, अशा गणिताच्या कोणत्याही शाखेतील उदाहरणे विनाविलंब सोडविता येतात, हे सिद्ध केले. गणिताचा कोणताही भाग या सूत्रांचा पलीकडे नाही, हे त्यांनी पाश्च्यात्य गणितज्ञांना मान्य करायला लावले. आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ त्यांनी वैदिक गणिताच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी देश-विदेशात व्यतीत केला.
आज, आपण सगळेच, CORONA (COVID - 19) मुळे, घरात बसून आहोत. दूरदर्शन वरील कोरोना संबंधीच्या बातम्या आणि त्याच-त्याच जुन्या मालिका पाहून / ऐकून कंटाळले आहोत. बाहेर तर जात येत नाही. थोडक्यात काय तर सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती, आज जगातील सगळ्यांचीच झालेली आहे.आज कोरोना मुळे आपण घरात बसून आहोत. काय सांगावं ? उद्या, कुणीतरी असा एखादा वि षा णू (virus ) तयार करेल आणि ई-मेल च्या माध्यमातून आपल्या संगणकात (Computers) सोडेल, किज्यामुळे सर्व संगणक (Computers) बंद पडतील. सगळी Apps. बंद पडतील, Internet बंद पडेल, कुणाशीही संपर्क साधता येणार नाही. आकडेमोड करता येणार नाही. त्यावेळेस आपल्याला आठवण होईल ती आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या वैदिक गणिताची.
वरील गोष्टींमुळे कदाचित आपण मनोरुग्णसुद्धा होऊ शकतो. आपल्या बुद्धीचा (मेंदूचा) वापर न केल्यामुळे "अल्झायमर" नावाचा रोग होऊ शकतो, हे जगजाहीर आहे. याचा त्रास समाजालाही होऊ शकतो.
आजच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, तसेच आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी, वैदिक गणित चा घरबसल्या अभ्यास हा एक उत्तम पर्याय आहे - अर्थात FACEBOOK LIVE च्या माध्यमातून, कि जेणेकरून त्याच्या वापराने आपला मेंदू ताजातवाना तजेलदार राहून - गतिमान होईल.
मग विचार कसला करताय ? ताबडतोब निर्णय घ्या आणि अधिक माहितीसाठी आपला भ्रमणध्वनी उचला आणि आम्हाला कॉल करा.
कुणाल सुतावणे - ९८१९५०४०२०विलास सुतावणे ९८३३४१०३६५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा