North East India - Hornbill Festival
डिसेम्बर २०१७ साली मला हॉर्नबिल फेस्टिव्हल - NAGALAND ला भेट देण्याची संधी मिळाली.
EVERY YEAR Festival WILL Held Between 01 - 10 DECEMBER
त्याचाच हा वृत्तांत..
"ऐकावं ते नवलंच" असे म्हणण्यापेक्षा "बघावं ते नवलंच" असं म्हणण्याची वेळ आली आहे. ते बघण्यासाठी भारतातून कमी आणि परदेशातुन जास्त मंडळी, (दरवर्षी, पंढरीच्या वारीला जसे वारकरी जातात त्याचप्रमाणे) नागालँड मधील किसमा या गावी येतात. कारण एकच कि भारतातील ईशान्येकडील राज्यांतील संस्कृतीची ओळख करून घ्यायची. कारण ती त्यांनी अजुनही जपली आहे आणि त्या संस्कृतीचे सादरीकरण पाहणे व त्यासाठी ला भेट देणे हा एक वेगळाच अनुभव आहे.
आम्ही ३ जण होतो. ह्या सहली दरम्यान आमचा मुक्काम नागा हाऊस अर्थात राजभवनामध्ये होता. आयुष्यात प्रत्येकाला खुप अप्रूप वाटेल इतकी मोठी गोष्ट होती ती. ब्रेकफास्ट असो किंवा मग जेवणाच्या वेळेला आम्ही तर खुद्द राज्यपालांसोबत असायचो. राज्यपाल मा. श्री पद्मनाभ आचार्य एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत.
आम्ही ३ जण होतो. ह्या सहली दरम्यान आमचा मुक्काम नागा हाऊस अर्थात राजभवनामध्ये होता. आयुष्यात प्रत्येकाला खुप अप्रूप वाटेल इतकी मोठी गोष्ट होती ती. ब्रेकफास्ट असो किंवा मग जेवणाच्या वेळेला आम्ही तर खुद्द राज्यपालांसोबत असायचो. राज्यपाल मा. श्री पद्मनाभ आचार्य एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत.
नागालँडची राजधानी कोहिमा येथून १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या "किसामा " या गावात हा उत्सव साजरा होत असतो. हे पारंपरिक गाव (Heritage village) किगवेमा आणि फेसामा या दोन गावांच्या मध्यावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. नागालँड राज्य सरकारने या दोन्ही गावातील दोन अक्षरे म्हणजे , किगवेमा मधील कि आणि फेसामा मधील सामा एकत्र करून किसामा Heritage village, असं या गावाचं नामकरण केलं. महोत्सवाचे मुख्य ठिकाण जरी किसामा असले तरी अलीकडे, राज्य सरकारने आणखी काही जिल्ह्यांचा , या महोत्सवात सहभाग असावा, या उद्देश्याने दिमापूर, पेरें,कोहिमा,मोकोकचुंग, अशा वेगवेगळ्या ठिकाणी विविध संगीत कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले आहे.
१ डिसेंबर रोजी रात्री दिमापूर येथे झालेल्या कैलास खेर यांच्या संगीत कार्यक्रमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
१ डिसेंबर रोजी रात्री दिमापूर येथे झालेल्या कैलास खेर यांच्या संगीत कार्यक्रमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या उदघाटन समारंभ हे या वर्षाचे मुख्य आकर्षण होते. १ डिसेंबर या नागालँड राज्याच्या स्थापना दिवशी राष्ट्रपतींनी या महोत्सवाचे उदघाटन केले. १ डिसेंबर१९६३ या दिवशी तत्कालिन राष्ट्रपती, सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन, यांनी नागालँड राज्याची स्थापना केली. ५४ वर्षानंतर, म्हणजेच १ डिसेंबर २०१७ रोजी भारताचे १४ वे राष्ट्रपती, श्री रामनाथ कोविंद ह्यांनी १८ व्या हॉर्नबिल फेस्टिवल चे उदघाटन केले. हा उत्सव म्हणजे उत्सवांचा उत्सव (Festival of Festivals) म्हणून ओळखला जातो, आणि नागालँड मधील किसामा हे गाव उत्सवांचे गाव (Land of Festivals) म्हणून ओळखले जाते. दरवर्षी, हा उत्सव १ - १० डिसेंबर या कालावधीमध्ये, Department of Art and Culture , Nagaland या विभागातर्फे आयोजित केला जातो. नागालँडच्या खालील १७ आदिवासींनी भाग घेतला होता. : अंगामी , ओ , चाखेचान्ग , चांग , कचारी , गारो , खियामनुनगन , कोनयांग , कुकी , लोथा , फोम , पोचूरी , रेंगमा , संगताम , सुमी , यिमचूनामरु आणि झेलिंग . सर्व नागा आदिवासी जमातींनी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. व्यासपीठावर राष्ट्रपतींचे आगमन होताच , काळे - पांढरे पट्टे असलेली नागा शाल (ज्याला ज्याला लोंगपेसू असे म्हणतात , नागा पगडी व नागा भाला देऊन , त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर साधारण ३ फूट व्यासाची धातूची गोल तबकडी, बांबूला लटकवून आणण्यात आली. राष्ट्रपतींनी त्यावर हातातील दंडाने ठोका मारला. त्याबरोबर, त्या तबकडीतून घंटेसारखा नाद पसरला. त्यावर उपस्थितांनी टाळयांचा गजर केला. अश्याप्रकारे, राष्ट्रपतींनी पारंपरिक पद्धतीने महोत्सवाचे उदघाटन केले. त्यांच्यासोबत, व्यासपीठावर नागालँडचे राज्यपाल - मा. पद्मनाभ आचार्य, मुख्यमंत्री टी. आर. झेलीयांग उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात, स्थानिक नागामीज भाषेत " सब नागा मनू के सलाम आसीम...." या वाक्यांनी केली. त्यामुळे अर्थातच आपला आनंद व्यक्त करण्यासाठी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते म्हणाले, कि नागालँडच्या विकासाची गुरुकिल्ली म्हणजे पायाभूत सुविधा व आधुनिक संपर्क यंत्रणा म्हणजे connectivity. या दोन गोष्टींमुळे, नागालँड जगाशी जोडले जाईल. नागालँडची ताकद, त्याच्या सेंद्रिय शेती उत्पादनांमध्ये; फळे, फुले, भाज्या आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींमध्ये आहे. यांच्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. शिवाय, नागालँडमध्ये आकर्षित करणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा शोध घेता येण्यासारखा आहे. त्यामुळेही अर्थव्यवस्था मजबूत होईल. इथे साक्षर तरुणांची संख्या प्रचंड आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारणीला त्यामुळे इथे खुंप वाव आहे.
पारंपरिक घरे
Heritage village मध्ये १७ नागा जमातींच्या लोकांची वेगवेगळ्या पद्धतीची घरे (मोरुंग) आहेत. पारंपारिक वस्तू वापरून, उदा. बांबू, लाकूड, गवत यापासून बनवलेलं खोपटं म्हणजे मोरुंग. घरात प्रवेश केल्यावर प्रथम दिसतो तो स्वयंपाकाच्या ओटा. तिथे सतत २४ तास चूल पेटलेली असते. थंड प्रदेशामुळे, त्यांना उबेची आवश्यकता असते. घरातील सर्वजण कामे झाल्यावर, ते चुलीशेजारी बसलेली असतात. चुलींच्यावर, छतावर वेगवेगळया प्राण्याचे मांस लटकलेले असते. चुलीतील सततची उष्णता व धुरामुळे ते मांसाचे तुकडे खरपूस भाजले जातात व त्यांना एक वेगळीच चवही येते.
काही घरांच्या बाहेर असे मांसाहारी पदार्थ बुफे पद्धतीने मांडून ठेवले होते. ते काय आहे, कसे असतील .... कसं बरं खावं ? या संभ्रमामुळे आमचा / उपस्थितांचा हात खरेदीसाठी खिशाकडे वळलाच नाही. परदेशी मंडळी मात्र त्यावर यथेच्छ ताव मारीत होती. हे वर्णन वाचून कुणाला वाटेल कि इथे अन्य पदार्थ खायला मिळत असतील कि नाही ...? पण तसे नाही. तुम्ही चिकन, कॉर्न पुलाव - बिर्याणी, विविध प्रकारच्या भाज्या यासारखे पदार्थ खाऊ शकता.
राजभवनावरील मुक्काम
आमची सोय राजभवनावर - झुकी हाऊस वर झाल्यामुळे आमच्यासाठी तो एक संस्मरणीय अनुभव होता. राजभवनामधील वेगवेगळ्या रूम्सना , नागालँडमधील शिखरे, दर्या-खोऱ्या, पर्यटन स्थळांची नावे दिली होती, उदा. सारामती (नागालँड मधील सर्वात ऊंच शिखर) सूट, पुलिया सूट, झापू सूट, संध्याकाळी राजभवनावर, ईशान्येकडील राज्यांच्या वेगवेगळ्या संगीतप्रकारांची "हॅन्डशेक मुझिक कॉन्सर्ट" आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाला बऱ्याच महनीय व्यक्तींची उपस्थिती होती. सध्या बेंगलोर येथे स्थियिक असलेल्या , एका नागा तरुणाने गिटारवर पारंपरिक नागा गीते व आधुनिक संगीत यांची जुगलबंदी सादर केली.सिक्कीम मधून आलेल्या कलाकारांनी कांचनजुंगा मधील स्नो-लायन डान्स सादर केला.अरुणाचल प्रदेशच्या कलाकारांनी "कुची द कुची गो ..... " संगीतनृत्य सादर केले. Harmony Voice या इंटरनॅशनल बँड सोबत नागा आदिवासींनी सादर केलेली समूहगीत थक्क करणारी आणि काळजाला भिडणारी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि यजमान स्वतः राज्यपाल मा. श्री पद्मनाभ आचार्य हे होते.
Hornibill Night Carnival
हा कार्निव्हल कोहिमा येथे संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत असतो. १० दिवस दिव्यांची रोषणाई केलेली असते. विविध प्रकारचे स्ट्रीटफूड्स , ज्युसेस मांडून ठेवलेली असतात. बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू, लाकडी आणि कागदी मुखवटे विक्रीसाठी ठेवलेले असतात. या उत्सवापासून ख्रिसमस पर्यंत सर्वत्र आनंद आणि उत्सवाला उधाण आलेले असते.
असाच एक लक्षात राहिलेला माणूस म्हणजे लालबहादूर सोनार ! मूळचा नेपाळचा, १९८५ पासून राजभवनावर काम करीत आहे. वर्षातून फक्त एक महिना सुटी घेऊन घरी जातो.अकरा महिने राजभवनात पाहुण्यांच्या दिमतीला हजर असतो. त्याने आतापर्यंत १४ राज्यपालांना सेवा दिली आहे.
असाच एक लक्षात राहिलेला माणूस म्हणजे लालबहादूर सोनार ! मूळचा नेपाळचा, १९८५ पासून राजभवनावर काम करीत आहे. वर्षातून फक्त एक महिना सुटी घेऊन घरी जातो.अकरा महिने राजभवनात पाहुण्यांच्या दिमतीला हजर असतो. त्याने आतापर्यंत १४ राज्यपालांना सेवा दिली आहे.
पर्यटकांच्या दृष्टीकोनातून अजूनही नागालँड, आपली नागभूमी दुर्लक्षितच आहे असे म्हणावे लागेल. परंतु तिथे एकदाच प्रवास केल्यावर तिथली निसर्गसंपदा, माणसे आपल्याला मोहात पडतात आणि मग ना. धो. महानोर यांनी लिहिलेलं , ज्येष्ठ गायक - रवींद्र साठे यांनी गायलेलं जैतरे जैत या चित्रपटातील गाणं आठवतं....
आम्ही ठाकर ठाकर , ह्या रानाची पाखरं !......
ह्या रानातल्या पाखरांचे दर्शन घ्यायला फार लांबवरून म्हणजे जर्मनीवरून मुद्दाम हॉर्नबिल फेस्टिवल साठी आलेले, श्री. कॅम्पस्क एबरहार्ड आणि सौ. उर्सुला कॅम्पस्क हे ८१ आणि ८० वर्षाचे दांपत्य आमच्या सोबत होते. त्यांनी संपूर्ण भारत बघितला होता. फक्त हा फेस्टिवल बघायचा राहिला होता. त्यांनी जाता जाता उल्लेख केला कि - NONE OF THE FESTIVALS AROUND THE WORLD IS MARVELOUS, WONDERFUL AND SPEECHLESS COMPARE TO HORNBILL FESTIVAL.
हॉर्नबिल फेस्टिवलला आलेल्या पर्यटकांमध्ये ९०% पर्यटक परदेशी होते. परदेशी पर्यटक इथे येऊन इतका आनंद लुटतात, कौतुक करतात, पण भारतीय पर्यटक मात्र अजूनही आपल्या नागभूमीकडे फिरकत नाहीत, हि खरोखरच म्हटलं तर लाजिरवाणी आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर हजारो भारतीय पर्यटक, या हॉर्नबिल महोत्सवाच्या निमित्ताने, नागालँड मध्ये आले तर त्यातूनच आपल्या एकत्वाची अनुभूती नागा समाजाला आणि आपल्याला होऊ शकेल. परदेशी पर्यटनासाठी, लाखो रुपये खर्च करणारे आपल्याच देशातील ईशान्येतील राज्यांना केवळ काही हजार रुपये खर्च करून कां भेट देत नाहीत? हा विचार आमच्या मनात घर करून राहिला आहे.
ह्या महोत्सवाला उपस्थित राहायची संधी आम्हाला मिळाली ती केवळ, ईशान्यवार्ताचे संपादक - श्री पुरुषोत्तम रानडे यांच्यामुळे. राजभवनावर आमची राहायची सोय झाली ती केवळ, इंडियन नॅशनल फेलोशीपचे पदाधिकारी - श्री दिलीप परांजपे आणि सुरेशराव साठे यांच्यामुळेच. वरील महोत्सवाचे वृत्तांकन करण्याच्या निमित्ताने आम्ही नागभूमीच्या अंतरंगात शिरू शकलो. मग विचार कसला करताय. आतापासून तयारीला लागा, चला तर मग येणाऱ्या डिसेंबरला कोहिमाला - हॉर्नबिल फेस्टिवलला।
कुणाल सुतावणे
९८ १९ ५० ४० २०
I felt like I had gone to Nagaland.Amazing experience.
उत्तर द्याहटवाBest writing. I felt like I had gone to Nagaland.Amazing experience.
उत्तर द्याहटवाthanks guys .. this comment initiate me for keep writing.
उत्तर द्याहटवा