Flower Pot Rocks - CANADA

Flower Pot Rocks - Hopewell Rocks
CANADA

हॉपवेल रॉक्स - 

आपण आपले घर, ऑफिस, हॉटेल्स सुशोभित करण्यासाठी काचेचे, प्लास्टिकचे अक्रेलिकचे मातीचे फ्लॉवर पॉट्स च वापर करतो. त्या फ्लॉवर पॉट मध्ये पेपर ची, प्लास्टिकची  किंवा निसर्गाने निर्माण केलेली फुले ठेवतो.

निसर्ग सुद्धा आपली पृथ्वी सुशोभित करण्यासाठी नदी कालवे, समुद्र, अभयारण्य, वाळवंट, हिमच्छादित शिखरे सप्तरंगी इंद्रधनुष्य आशा विविध गोष्टींचा वापर करतो आणि आपली आजूबाजूची सृष्टि नटवत असतो. या मध्ये अधिक भर घालायचीच झाली तर कॅनडा मधील न्यू ब्रुंसविक सी (New Brunswick Sea) या सागर किनारी जवळ एका होपवेल केप येथील फंडी  खाडित - होपवेल रॉक्स किंवा फ्लॉवर पॉट रॉक्स ची निर्मिती झाली आहे. ही निर्मिती कदाचित हिमयुगात झाली असावी असा तज्ज्ञ मंडळींचा अंदाज़ आहे.

फंडी खाड़ी मध्ये ४० - ७० फुट उंचीची रॉक्स आहेत. तय रॉक्स वर सतत सागराच्या लाटा आदळून त्यांची झीज झाली. आणि त्यांचा आकार फ्लॉवर पॉट सारखा झाला. तय रॉक्स च्या वरच्या भागात निसर्गाने निर्माण केलेली वेगवेगळ्या वनस्पती आणि फुले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच त्याला फ्लावर पॉट रॉक्स असेही म्हणतात. त्यांच्या आकारप्रमाणे त्यांना Lovers Arch, Dinosaur Rocks, Mother In Law अशा विविध प्रकारची नावे त्यांना दिलेली आहेत. 

ACADIE, ACADIE – Yves Petit – Envie de voyager?

वरील ठिकाणी भेट द्यायला १० मे - १५ ऑक्टोबर या कालावधीत जाऊ शकता. त्या (न्यु ब्रुंसविक सी) जाण्यापूर्वी भरती - ओहोटी ची वेळापत्रक जाणून घ्यायला विसरु नका. अशा  प्रकारचे वेळापत्रक सागर किनारी लावले आहेच. तुम्ही कैनेडियन डॉलर १० (भारतीय रुपये ५५० ) चे टिकट घेतले की सलग दोन दिवस इथे या स्थळाला भेट देऊ शकता. भरतीच्या वेळेस फ़क्त आपल्याला वनस्पति आणि वेगवेगळी फुले दिसतात, फ्लॉवर पॉट पाण्यात बुडलेला असतो. ओहोटीच्या वेळेस फ्लावर पॉट आणि वनस्पति या दोघाचेही दर्शन होते. ओहोटीच्या वेळेस आपण फंडी खाड़ी मध्ये २ किमी आत चालत जाऊ शकता. फंडी खाड़ी ही एक अजस्त्र लाटांचे माहेरघर म्हणुन ओळखले जाते. कारण येथील लाटांची ऊंची ४०-५०  फुट इतकी असते.   

हिवळयांच्या  दिवसात आपण आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर इथे भेट देऊ शकता. कारन हिवाळ्यात इथे बर्फाचे सुळके तयार होतात. 
Hopewell Rocks, NB | Magnesium Blue  File:Raccoon climbing in tree - Cropped and color corrected.jpg ...

हॉपवेल रॉक्स पार्क मध्ये पांढऱ्या रंगाचे शेपटी सलेले हरिण, कराडया रंगाचे लहान प्राणी (RACCOON), सलिंदर, ससे, लाल कोल्हे, अस्वल ऐसे अनेक प्राणी आपल्याला इकडे तिकडे बागडताना दिसतात. तसेच त्याच वेळेस समजा तुमचे नशीब चांगले असेल तर बाहिरि ससाणा, सी बर्ड, शिंग असलेले घुबड पाहायला मिळतात.

white and brown deer walking near body of water beside forest trees 

भरतीच्या वेळेस तुम्ही कयाकिंग या वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटीचा सुद्धा आनंद घेऊ शकता. 

अशा सुंदर ठिकाणी जायला जवळचे विमानतळ म्हणजे कॅनडा येथील Mountain  N.  B. 
या विमानतळावरून तुम्ही १ तासाच्या अंतरावर Flower Pot Rocks / Hopewell Rocks अथवा Hopewell Rock Park आहेत. 

Things to do in New Brunswick - Hecktic Travels

एक महत्वाचे - 
अमेरिके मधून नायगरा वॉटर फॉल बघून झाला की सगळ्यांची इच्छा असते आपण हाच नायगरा आता कॅनडा मधून बघुया. ह्याच कॅनडा मधून नायगरा वॉटर फॉल च्या इथून ट्रैन ने गेलात तर हे होपवेल रॉक्स ६-७ तासावर आहेत. 

तर मग कधी जाताय... अशा या हटके ठिकाणी!!!

कुणाल सुतावणे 
९८९५०४०२० 
www.vivisudehra.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख