mercedes benz museum stuttgart

मर्सिडीज बेन्ज़ संग्रहालय - स्टुटगर्ट - यूरोप 

लहानपणी प्रत्येकलाच वेड असते ते कारचे - मोटारीचे. लहान मुलाला त्याच्या हातात आई वडील ती कार आणुन देतात किंवा मग कोणीतरी भेट म्हणून वेगवेगळ्या आकाराची, रंगाची, प्लास्टिक ची लाकडाची टी कार असते. मग ती कार  स्प्रिंगवर चालणारी असो, रिमोट वर चालणारी असो. हेच आकर्षण ऊराशी बाळगून प्रत्येकजण मोठा होत असतो ते फ़क्त स्वत:ची कार असण्यासाठी मग ती नॅनो, वेगॉनोर किंवा मर्सिडीज बेन्ज़ असेना.

लहान मुलगा थोड़ा मोठा झाल्यावर म्हणजेच शाळेत जाऊ लागल्यावर त्याला वेड लागते ते खिडकीत उभे राहुन समोरून येणारी गाड़ी कुठल्या कंपनीची आहे हे जाणून घेण्यासाठी. हे वेड सर्व सामान्य माणसाला लागतेच असे असे नाही तर सर्वाना परिचित असलेला अभिनेता नाना पाटेकर सुद्धा हेच करायच.

त्याहीपेक्षा पुढे जाऊन प्रत्येकजण आपल्या मित्रांबरोबर तो समोरून येणारी गाड़ी कोणत्या कंपनीची आहे हे ओळखायची पैज लावायचा.

मर्सिडीज बेन्ज़ हे नावच सगळ्यांना वेड लावणारे आहे. आज प्रत्येकाचे स्वप्न असते ही गाड़ी आपल्याकडे असावी, पण प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतच असे नाही.

कार्ल बेन्ज़ याचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ साली झाला. २ वर्षाचा असताना त्याचे वडील मृत्यु पावले. घरची आर्थिक परिस्थिति चांगली नसताना सुद्धा त्याच्या आईने मेहनत करुन त्याला चांगले शिक्षण दिले. कारचा छंद असलेल्या या व्यक्तिने जगातील पहिली पेट्रोल कार १८८६ साली बनविली आणि त्याचे पेटेंट घेतले. श्री. क्ली यांच्या सहकार्याने Benz & Clie ही कंपनी स्थापन करुन आपल्या कारचे एक यूनिट जर्मनी मध्ये स्थापन केले.  या कंपनीचे डायरेक्टर आणि त्यांचे पार्टनर इमिल जेलिनेक यांच्या मुलीचे मर्सिडीज हे नाव आपल्या गाडीला द्यायचे ठरवले.

मर्सिडीज बेन्ज़ नावाची कार जन्माला आली ती १९२६ साली.

आत्तापर्यंत या कंपनीने १७० हुन अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या गाड्या बनविल्या त्यामध्ये ट्रक, मोटारी, रेसर कार्स यांचा समावेश आहे. या सगळ्या गाड्या एकत्रित पणे पाहण्यासाठी यूरोप मधील स्टुटगर्ट ठिकाणी एका प्रशस्त ८ मजली आणि १७८००० चौ. फुट मध्ये उभे असलेले आणि मर्सिडीज बेन्ज़ या कंपनीने बनविलेले कार्स चे मॉडेल्स बघण्यासाठी हे संग्रहालय म्हणजे मर्सिडीज बेन्ज़ चे विश्व आहे.

१९ मे २००६ रोजी पर्यटकांसाठी खुल्या झालेल्या या संग्राहलयात प्रवेश केल्यावर आपल्याला जाणवते ते म्हणजे एक ऑटोमोबाइल चे अनोखे दिमाख्दार विश्व.


८ मजली असलेल्या या संग्राहलयात
पहिल्या भागात आपल्याला दिसते ते ऑटोमोबाइल चा जन्म कसा झाला. म्हणजे १८८६ - १९०० चा कालखंड.
दुसऱ्या भागात मर्सिडीज बेन्ज़ चा जन्म म्हणजे  १९०० - १९१४ चा कालखंड.
तिसऱ्या दालनात १९१४ - १९४५ मध्ये आलेल्या डिजेल वरील चालणाऱ्या गाड्या बघायला मिळतात.
चौथ्या भागात १९४५ - १९६० मधील गाड्या म्हणजे जगासाठी ठरलेले Miracle च
पाचव्या भागात १९६० - १९८९ मध्ये आलेल्या व्हॅन ट्रक यांची मॉडल्स
सहाव्या आणि सातव्या भागात सर्व काही विशेष आपण तिथेच जास्त रमतो कारण १९८२ पासून पुढे बनविलेल्या सर्व lavish आणि luxury कार्स याशिवाय रेसिंग कार्स आपल्याला इथेच बघायला मिळतात.

एका भागातून दुसऱ्या भागात प्रवेश करताना वेगवेगळ्या गाड्या बघायला मिळतात ते तर अवर्णनीय.

A virtual tour of the Mercedes-Benz Museum in Stuttgart, Germany ...

mercedes benz museum stuttgart pictures history ronan glon simplex 40 ps 1

Racing cars at Mercedes-Benz Museum Stuttgart Germany | Flickr


२००७ साली जवळजवळ ८५०००० पर्यटकांनी या संग्राहलयाला भेट दिली. पण आज खेदाने सांगावे लागते की आमच्या व्यतिरिक्त कोणीतीही पर्यटन कंपनी हे म्यूजियम दाखवत नाही. तुम्ही जगात कोणाही सोबत भटकंती करा, पण जर्मनी मध्ये गेलात की आवर्जून ह्या म्यूजियम ला भेट दया.

या संग्रहलयात प्रत्येक मॉडल ची माहिती आपल्याला हव्या त्या भाषेत ऑडियो टूर द्वारे घेऊ शकतो. प्रत्येक कार मर्सिडीज बेन्ज़ बघण्यासाठी हे संग्रहालय पर्यटकांसाठी मंगलवार ते रविवार सकाळी ९ वा. पासून संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत खुले असते. त्याची प्रवेश फी यूरो १० मात्र (म्हणजेच भारतीय रुपये ८५० अंदाजे ) इतके आहे.

तिथे गेल्यावर एका गोष्टीचा अनुभव घ्या...

या संग्रहलयाचा आनंद इतरांबरोबर share करण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी कॅमेरे नेहमीच सज्ज असतात ते फोटो अथवा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी. पण खरच तिथे काढलेले फोटो आणि केलेले शूटिंग आपल्याला परत बघायला मिळते का.?

कुणाल सुतावणे
९८१९५०४०२०

www.vivisudehra.com



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख