.. Jara Yad Karo Kurbani !!!
... जरा, याद करो कुर्बानी !!!
परमवीरचक्र विजेत्या पराक्रमी योध्दयांविषयीच्या माहितीचे संकलन करून ... जरा, याद करो कुर्बानी !!! हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक, विलास सुतावणे यांनी २६ जुलै, या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विविसु डेहरा या संस्थेने प्रकाशित केले. आपल्या सैन्यदलातील शूरवीर सैनिकांविषयी आदर व्यक्त करावा या विचारांतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली . विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ नामवंत मान्यवरांकडून त्यांनी यातील परमवीरचक्र विजेत्या वर लेख लिहून घेतले व पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले.
या पुस्तकात वाचकांना परमवीर चक्राबाबत परिपूर्ण माहिती मिळते . परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैन्यपुरस्कार युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी दिला जातो. जो पराक्रम जमिनीवर, समुद्रावर किंवा हवेत शत्रूवर बहादुरी गाजविणाऱ्या सैनिकाला दिला जातो. १९९९ पर्यंत २१ परमवीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. यातील १४ पुरस्कार हे मरणोत्तर दिले गेले. २१ पैकी २० पुरस्कार भारतीय सैन्यदलातील जवानांना तर एक पुरस्कार वायुसेनेच्या सदस्यास प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार विजेते सैन्यातील कुठल्या पथकात होते, उदा. बिहार रेजिमेंट, महार रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जम्मू-काश्मीर लाईट रेजिमेंट, भारतीय वायुसेना, शीख रेजिमेंट, इत्यादीची सविस्तर माहिती , तसेच त्यांनी दाखवलेल्या कुठल्या पराक्रमाबद्दल , शौर्याबद्दल हा पुरस्कार त्यांना दिला गेला त्याचे वर्णनही या पुस्तकात केले आहे.
१९५० साली परमवीरचक्र प्रदान करण्यास सुरवात झाली. पहिले परमवीरचक्र मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर देण्यात आला. परमवीरचक्र ची रचना श्रीमती सावित्रीबाई खानोलकर यांनी केली असून, त्या सोमनाथ शर्मा यांच्या सासूबाई होत्या. त्यानंतर मेजर यदुनाथ सिंह, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, कंपनी हविलदार मेजर पिरुसिंघ शेखावत, लान्स नाईक करमसिंग, कॅप्टन गुरुबचंन सिंग सलारिया, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग ,मेजर सैतान सिंग, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखो , सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, नायक सुभेदार बाणासिंग , लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, ग्रेनेडीयर योगेंद्र सिंग यादव आणि रायफलमॅन संजयकुमार, इत्यादी, परमवीरचक्र विजेत्या लढवय्यांच्या शौर्याची गाथा म्हणजेच ... जरा, याद करो कुर्बानी !!!
या पुस्तकात वाचकांना परमवीरचक्राच्या बरोबरीने सैनिकांना त्यांच्या श्रेणीनुसार दिल्या जाणाऱ्या मानचिन्हांचा तसेच भारताची सामरिक सिद्धता, क्षेपणास्त्राची माहिती, भारतीय लष्करातील विश्वासू श्वानदल, युद्धाचा अंदाजे येणार खर्च, लष्करात सामील व्हायचे असल्यास, त्यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीची संकेतस्थळे या विषयीचीसुद्धा माहिती, या पुस्तकात दिली आहे.
या परमवीरचक्र विजेत्यांच्या शोर्याच्या पराक्रम कथा वाचताना अंगावर काटा येईल, डोळ्यात अश्रू उभे राहतील , मान ताठ होईल, छाती अभिमानाने भरून येईल, मनातील राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती उफाळून येते असे हे पूर्णपणे, प्रेरणादायी पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.
सौजन्य - डॉ. धनश्री साने
कुणाल सुतावणे
९८१९५०४०२०
www.vivisudehra.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा