पेनांग मलेशिया
पेनांग मलेशिया मलेशियाच्या वायव्य किनाऱ्यावर मलाक्काच्या खाडीच्या काठी पेनांग वसलेले (एक लहानसे राज्य) आहे. मलाया भाषेत “पुलाड पिनांग” म्हणजे सुपारीचे झाड यावरूनच या बेटाला “ पेनांग ” असे नाव पडले आहे. पेनांग पर्ल ऑफ द ओरियंट असे म्हणतात पेनांग हे बेट मलेशियाच्या किनाऱ्यावरून फक्त आठ किमी अंतरावर असून या बेटाचा आकार पाण्यात पोहणाऱ्या एका कासवासारखा आहे. एप्रिल ते सेप्टेंबर या काळात पेनांग राज्यात भरपूर पाऊस पडतो. हवामान विषुववृत्तीय म्हणजे ऊबदार, भरपूर सूर्यप्रकाश आणि जोरदार पाऊस असे असते. पेनांग बेट हे खवय्या साठी एक स्वर्गच मानले जाते. संपूर्ण मलेशियातून आणि शेजारच्या सिंगापूरमधून खाद्यप्रेमी आपली खाण्याची हौस पूर्ण करायला येतात. पेनांगच्या खाद्यसंस्कृतीवर चायनीज , न्योनया, मलाय आणि भारतीय शैलीचा प्रभाव पडतो. पेनांग मधील स्थलदर्शन :- जॉर्जटाऊन – पेनांग राज्याची राजधानी. १७८६ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सीस लाइट याने हे शहर वसवले ब्रिटनचा राजा जॉर्ज (तिसरा) या नावावरुन या शहराचे नाव ठेवले. “चिऑग फात ...