पेनांग मलेशिया
पेनांग मलेशिया
मलेशियाच्या
वायव्य किनाऱ्यावर मलाक्काच्या खाडीच्या काठी पेनांग वसलेले (एक लहानसे राज्य)
आहे. मलाया भाषेत “पुलाड पिनांग” म्हणजे सुपारीचे झाड यावरूनच या बेटाला “पेनांग” असे नाव
पडले आहे.
पेनांग पर्ल ऑफ द ओरियंट असे म्हणतात
पेनांग हे बेट मलेशियाच्या किनाऱ्यावरून फक्त आठ किमी अंतरावर
असून या बेटाचा आकार पाण्यात पोहणाऱ्या एका कासवासारखा आहे.
एप्रिल ते सेप्टेंबर या काळात पेनांग राज्यात भरपूर
पाऊस पडतो. हवामान विषुववृत्तीय म्हणजे ऊबदार, भरपूर सूर्यप्रकाश आणि जोरदार पाऊस
असे असते.
पेनांग बेट हे खवय्या साठी एक स्वर्गच मानले जाते. संपूर्ण मलेशियातून आणि शेजारच्या सिंगापूरमधून
खाद्यप्रेमी आपली खाण्याची हौस पूर्ण करायला येतात. पेनांगच्या
खाद्यसंस्कृतीवर चायनीज, न्योनया, मलाय आणि भारतीय शैलीचा प्रभाव पडतो.
पेनांग मधील स्थलदर्शन :-
जॉर्जटाऊन – पेनांग राज्याची
राजधानी.
१७८६
साली ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सीस लाइट याने हे शहर वसवले ब्रिटनचा राजा जॉर्ज
(तिसरा) या नावावरुन या शहराचे नाव ठेवले.
“चिऑग फात त्झे मॉशन” ही या शहरातील भव्य वस्तु १८९० साली बांधण्यात आली. “चिऑग” या चीनी व्यापाऱ्याचे निवासस्थान या वास्तूत ३८ खोल्या, ७ जीने आणि २२० खिडक्या आहेत.
याशिवाय
फोर्ट कॉर्नवालीस, लेऑग सान टॉग खु, वट चैयामंगलांमम् बुद्ध मंदीर,
*कॉक लॉक सी – बुद्ध मंदीर.
याचा अर्थ असा “सर्वोच्च सुखाचे मंदीर” हे मंदिर म्हणजे एक सात मजली पॅगोडा आहे. या मंदिरात बुद्धाच्या १०००० मूर्ती आहेत.
इतर स्थलदर्शन पेनांग हिल.
पेनांग ब्रिज
स्नेक टेंपल -
पेनांग मधील बयान लेपास्त चा लहानशा गावात सर्प मंदीर आहे. पूर्वीच्या काळी इथे सापांची संख्या बरीच होती पण आता ती कमी झाली आहे. तरीही व्हयपर नाग, विषारी साप अजुनही दिसतात.
पेनांग बर्ड पार्क -
आपल्याला शहामृग, समुद्रगरुड, फ्लेमिंगो, मकाव असे विविध प्रकारचे पक्षी बघता येतात.
बाटू फेरिंधी -
म्हणजे परदेशी माणसांची टेकडी. पर्यटन स्थळ म्हणून सगळ्या देशात सर्वात जास्त विकसित आणि प्रसिद्ध असलेला सागरकिनारा. पांढऱ्या रंगाचा वाळूचा किनारा आणि हिरवी नारळाची झाडे यांमुळे इथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.
कसे जायचे :-
थायलंड, मलेशिया – कौलालंपूर, सिंगापूर, इंडोनेशिया या देशातून हवाईसेवेचे
पर्याय उपलब्ध आहेत शिवाय वटरवर्थ या शहरापर्यंत रेल्वेसेवा थायलंड येथून उपलब्ध
आहेत.
पेनांगमध्ये
फिरण्यासाठी रॅपीड पेनांग ही बससेवा उपलब्ध आहे, शिवाय तीन चाकी रिक्षात बसून
आरामात रमत, गमत, फोटो काढत स्थलदर्शन करता येते.
वास्तव्य :-
चांगल्या
दर्जाची हॉटेल्स इथे उपलब्ध आहते. B.suite Penang, Hotel Royal Penang., Estin Hotel, साधारण पणे १५०० रु. पासून हॉटेल्स आहेत.
·
मलेशिया पेनांग मध्ये जाण्यासाठी व्हिसा आवश्यक.
·
हॉटेल बूकिंग आधीच केलेले चांगले.
·
टॅक्सीत बसण्यासाठी आधीच घासाघीस करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा