“ त्या चार चौघी "

 

“ त्या चार चौघी "

आपल्याकडे एखादी कला अवगत असेल तर ती दुसऱ्यांना शिकवायची त्याचा त्या कलेचा प्रसार करायचा. ह्या मधला आनंद काहीसा निरळा असतो. तसेच काहीस घडलं  त्यांचा बाबतीत. मध्यप्रदेश इंदोर मध्ये राहणाचा त्या  चार चौघी . मनात  आलं आणि त्यांनी ते करून दाखवलं  माधवी कुलकर्णी शुभा वैद्य, श्वेता  अनुग्रह आणि राणदीप सरदाना (मुळच्या  पंजाब प्रांता मधील, पण गेल्या कैक वर्षापासून इंदोर मध्ये स्थानिक).

शिक्षक पाहिजेत, इथे येऊन काहीतरी शिकवा. तुमच्या रेग्युलर रुटीन मधून बाहेर पडून इतरानही आपल्यात सामील करून घ्या,  कल्याण आश्रम च्या वतीने एका कॅम्पच्या - उद्देशाने ज्वेलरी मेकिंग, छत्र्‍या पेंटिंग, वारली पेंटिंग चे शिबिर घेण्यात आले. खर तर त्या चौधीही कलाकार आहेत. शुभा वैद्य SDPS फॅशन डिझायनिंग कॉलेज  मध्ये  शिक्षिका आहेत. कुलकर्णी टेलरिंग आणि एंब्रोडरी चे काम करतात. श्वेता अनुग्रह पेपर ज्वेलरीचे, ज्वेलरी मेकिंग चे मार्गदर्शन करतात राणदीप सरदाना - रंगोली चित्रांची कला आहे.

ईशान्य भारतामध्ये राहाण्याचे निशचित झाले तेव्हा प्रचंड planning आणि paper work च्या जोरावर ६० हजारांची sponsorship (प्रायोजक) मिळवली ती sponsorship फक्त आणि फक्त कलेचे साहित्य घेण्याकरिता.. १५० छत्र्या, काही शे मीटर फॅब्रिक, चिंध्या, स्पंज, spray, मणी, मोती, दगडी मोती, तारा, सुया, कटर्स, डिझायनर हुक्स त्या सारखा असंख्य गोष्टी त्यांनी इथुनच विकत घेतल्या. या सर्वांपासून त्यांनी अनेक वस्तु बनवल्या आणि तेथील मुलाना शिकविल्या.

कल्याण आश्रम च्या वतीने उदलगुडी येथिल ६० आणि बाईबॉम येथील ३२ मूलाना या ज्वेलरी मेकिंग, छत्र्‍या पेंटिंग, पेपर  पेंटिंग, पेपर ज्वेलरी चे प्रशिक्षण दिले. माधवी ताई संगत होत्या, आम्ही जेव्हा त्यांना ही कला शिकवत होतो त्याचसुमाराम त्यांचेकडून हि आम्ही बरेच काही शिकत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स त्यांनी बनवीलेले डोळे दिपवून टाकत होते. मॉव्रेमचे केलेले पॅट, त्यावरचे रंगकाम हॉगर्स असे विविध प्रकार, कागदाची ज्वेलरी, आर्टिफिशीअल ज्वेलरी, कानातले, गळ्यातले हर आणि  महाराष्ट्राची वारली चित्रकला, मांडना ह्या सोज्या लोककलांचे चित्ररूपी दर्शन दाखविल्यावर ये तो बहुत राझी है | असे करत त्यांनी बरीच पेंटींग्ज काढली. दोन त्रिकोण आणि चार रेषांनी काढलेल्या  अॅक्शनस त्यांनी पट्कान ओळखल्या. मांडना करताना बारीक रेषांचे भरवणे प्रत्येक जण सफाईने  करत होत्या. काचांचे तुकडे चीकटवताना प्रत्येकामध्ये चित्रकाराची दूरदृष्टी दिसून येत होती.






       शुभा ताई यांनी छत्र्यांवर रंगरंगोही करायचे प्रशिक्षण दिले. Texture वापरायचे.. मग ते स्पंज, कूटलेही प्लास्टीक, दाताचे  पंजे, स्फ्रे, कलर बॉटल चा वापर केला. छत्री उघडी ठेवून, बंद देवून  कशा  डीझाइन तयार होतात हे सांगितले. शिवाय तिथल्या मुलांची निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती तेज असल्यानेच त्यंनी त्यांचा डोकँलिटी चा वापर करून स्वतःची डीझाईन तयार केली. Permanant Markar चाही वापर केला तो डीझाईनला  outline देण्याकरिता. अभुत चित्रशैली, Abstract-modern Paintings चा वापर करून १५० छत्र्यांवेर वेगवेगळे डीझाईन तयार झाले. एकही डीझाईन सारखे नाही.

       मुलींनी स्वतः बनविलेली ज्वेलरी जेव्हा त्यांनी परिधान केली तेंव्हा त्यांचा आनंद बघून आम्ही भारावून गेलो.  ह्या ज्वेलरी घातल्यावर फॅशन शो rampwalk च्या हरकती इथे अनुभववायला मिळाल्या.

प्रशिक्षण संपल्यावर घरी जायच्या वेळेला अश्रु अनावर झाले. आणि एक गोष्ठ इथे जाणवली ती म्हणजे ह्या कलेमधून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांना शिकण्याची (नवीन काहीतर) इच्छा आहे त्याची कला लोकांसमोर आली पाहिजे. या कालेमधून रोजगार त्यांना मिळाला  तर या प्रशिक्षणाचा – वर्गाचा फायदा झाला अस म्हणता येईल.  कारण तिथ्ल्या मुलांकडे वेगळ्या टेकनिक्स आहेत. प्रत्येक गोष्ट ते खूप कुशलतेने बनवितात.

मला असं  वाटत इथेच माणूसकी जपली जाते. एक नवीन नाते निर्माण होते. एक गोष्ट नमूद केल्यशिवाय शोबता येत नाही. दृष्टी आणि दृष्टीकोन मधील फरक जाणवला की सारे शकत  होते फक्त कुठलीही गोष्ट  करण्यासाठी  मनापासून इच्छा झाली पाहिजे. 

आज तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की ईशान्य भारतात एक भेट दया .. नवीन काहीतरी तिथल्या मुलांना शिकवा, तुम्ही पर्यटक म्हणून गेलात तर तिथल्या लोकांमध्ये परिवर्तन घडवा. त्यांची काहीतरी वेगळ्या शिकायची बरीच इच्छा आहे फक्त शिकवणारं कोणीतरी हवे आहे. कौशल्य विकास च्या अंतर्गत आज बरेच उपक्रम तिथे राबवले जातात, तुम्ही त्याचा एक भाग त्यांच्यासाठी होऊ शकता. 

जरूर संपर्क करा .. 

KUNAL SUTAVANE

9819504020


      

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख