Borobudur - Indonesia

बोरोबुदुर - एक बुद्ध मंदिर
इंडोनेशिया

जगातील स्थापत्यकलेचा एक आश्चर्यकारिक नमूना म्हणजे हे इंडोनेशियातील बोरोबुदुर - एक बुद्ध मंदिर. इंडोनेशिया तील मध्य जावा भागातील मागेलांग परिसरामध्ये अगदी प्रबंनन या हिंदू मंदिराच्या शेजारीच असलेले जगातील सर्वात मोठे बुद्ध मंदिर - बौद्ध स्तूप आपण  म्हणू शकतो.



साधारणपणे ९व्या शतकात इ. स. ८२५ मध्ये शैलेंद्र राजाच्या राजवटीमध्ये बांधलेले हे मंदिर. या मंदिराची मूळ संकल्पना म्हणजे बौद्ध स्थापत्य शास्त्राचा अभ्यास , पूर्वजांची उपासना आणि निर्वाण या जाणिवेचि बौद्ध संकल्पना इंडोनेशिया च्या लेखी काय आहे ह्याचे उत्तम उदहरण म्हणजे हे बुद्ध मंदिर. खरं तर इथे असलेली प्राचीन मंदिरांचा उल्लेख जावनीज् साहित्यानुसार कॅंडी म्हणून केला जातो. पण ज्या वेळेला सर थॉमस रैफल्स - सिंगापुरचे  राष्ट्रपिता  यांनी  जेव्हा इथे भेट दिली आणि त्यांनी एक प्राचीन मंदिरावर पुस्तक लिहिले. आणि ते पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांनी ह्या मंदिराबद्दल जो उल्लेख - बोरो म्हणजे प्राचीन आणि बुदुर म्हणजे पवित्र बुद्ध मंदिर असा केला आहे. अशा वरुनच त्याचे नाव बोरोबुदुर पडले. तसे पाहायला है एक मोठा बौद्ध विहार समजला जातो.

Borobudur Third on National Geographic's List of Iconic Adventure ...

या मंदिराची रचना अतिशय विलक्षण आणि आकर्षक आहे. मंदिराची ऊंची ३५.५ मी. असून त्याचे एकूण ९ टप्पे / लेवल्स आहेत. त्यापैकी ६ टप्प्या / लेवल्स पर्यंत आपल्याला जाता येते. वरील ३ टप्पे वर्तुलाकार आहेत.

या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दगडी उंच पायऱ्या चढून जावे लागते. २० लाख मोठ्या शिळा वापरल्या गेल्या आहेत. ५५००० क्यूबिक्स मीटर्स लाव्हा इथे वापरण्यात आला. या सगळ्या शिळा एका पिरॅमिड प्रमाणे रचण्यात आलेल्या आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर तिथे बुद्धांच्या विविध मुद्रा व तीन अवस्थांचे दर्शन आपल्याला घडते. काम, रूपा व अरूपा धातू. शेवटची स्थिति म्हणजे संतरूप.  इथे बुद्धांच्या ५०४ मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाच्या भोवती इथे एकूण ७२ बुद्ध मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. हे मंदिर जार आपल्याला अतिशय बारकाईने पहायचे असेल तर साधारणपणे २१ दिवस इथे लागतात. असे गाइड सांगत होता. मंदिराच्या आतमध्ये जगा नाही. त्याच्या चारही बाजूने प्रदक्षिणा घालुनच त्याचे भव्य दिव्य स्वरुप लक्षात येते.

बोरोबुदुर मंदिरात आत जाताना पूर्वी लुंगी नेसुनच जावे लागत . त्याला "सरोंग" असे म्हणतात. प्रवेश तिकीट घेतल्यावर लुंगी नेसवली जाते. पण  आता तसे नाही. इथे पाण्याची बाटली व चहा कॉफी मोफत मिळते.

Reaching enlightenment and protecting the Borobudur Temple - Maria ...

बोरोबुदुर बुद्ध मंदिर हे जगातील सातवे आश्चर्य मानण्यात येते. पूर्वी इथे कोणताच धर्म नव्हता. चवथ्या शतकात गुजरात मधून एक व्यापारी आला, त्याने हिंदू धर्माची ओळख ओळख करुन दिली. पाचव्या शतकात बुद्ध धर्म इथे आला. हळूहळू हे दोन्ही धर्म वाढू लागले. त्यातूनच बोरोबुदुर हे बुद्ध मंदिर आणि प्रबंनन हे हिंदू मंदिर ह्याची उभारणी झाली. अशी आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते.
Stupa Candi Borobudur | Balai Konservasi Borobudur
या ठिकाणी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला एक मोठा उत्सव साजरा केला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख