पर्यटन एक नशा ... ओळख

पर्यटन एक नशा ... ओळख 

पर्यटनातून एक सामाजिक बांधिलकी अशी एक संकल्पना मनाशी बाळगून मी पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ५ जून रोजी हिंडाल ,फिराल, पहाल तर शिकाल !! हे ब्रीदवाक्य घेऊन विविध विषयात सुसंपन्न होण्यासाठी आम्ही तंबू ठोकला.. अर्थात डेरा टाकला. म्हणजेच "विविसु डेहरा" ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

गेली २४ वर्षे ८ वर्षावरील विद्यार्थीसाठी CAMP MANALI, CAMP NAINITAL चे आयोजन आणि पर्यटन व्यवसायात कार्यरत आहोत
रौप्य महोत्सवा कडे वाटचाल करताना
  1. जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारु स्वछंद वेगवेगळ्या देशांच्या ... जडन  घडणीची, संकृतीची ओळख होण्यासाठी पर्यटन गप्पांचा कार्यक्रम.  
  2. ओळख - ईशान्य भारताची  अर्थात पूर्वांचलाचे अंतरंग उलगडून दाखविणारे प्रदर्शन आणि व्याख्यान 
     
  3. जरा यद् करो करो कुर्बानी या पुस्तकाची निर्मिती 
  4. परमवीर चक्र विजेत्याचे शौर्य कथन'करणारे व्याख्यान 
त्याचबरोबर वैदिक गणित, गोष्ट एक कार्व्हरची अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आत्तापर्यंत डोंबिवली करांना आणि इतर शहरातील विद्यार्थींना देत आलो.

पर्यटन व्यवसाय  सुरु करताना शिबिरार्थींना आणि पर्यटकांना नूसतेच निसर्ग सौंदर्य किंवा विविध प्रदेश दाखविणे एवढाच मर्यादित उद्देश्य न ठेवता तर तेथे जाऊन तेथील लोकजीवन, लोककला चालीरीती लोकसाहित्य यांचे दर्शन व्हावे, ओळख व्हावी है सुद्धा हेतु होताच. 

आपले हात प्रार्थनेपेक्षा दुर्बलांच्या सेवेसाठी उपयोगात आले तर जस्ट योग्य - नाना पाटेकर 
आणि म्हणूनच विविसु डेहरा बरोबर
पु. ल. देशपांडे त्या प्रमाणे आनंदवनात पर्यटक म्हणून या आणि परावर्तित होऊन जा. 
आपण समाजचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात  ठेऊन आणि त्यातून उतरे होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आनंदवन हेमलकसा सोमनाथ ताडोबा सहल. 

लेह लडाख , कारगिल,  तवांग, कोहिमा, मणिपुर - मोरेह, मेघालय - शिलॉंग, रानीखेत या ठिकाणी सहली न्यायला सुरुवात केल्यावर तेथील युद्ध स्मारके पर्यटकांना दाखविताना सैनिकांचे जीवन दर्शनही घडवू लागलो. 
एक दिवस सैनिकांसाठी अर्थात सीमादर्शन है कार्यक्रम आखला. जो पर्यटकांना आवडला आणि म्हणूनच भारतीय सैनिकांची यशोगाथा लोकांच्या समोर आणण्यासाठी .. जरा याद करो कुर्बानी !!! हे परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या वीरपुत्रांचे पराक्रम वर्णन करणारे पुस्तकाची निर्मिती केली। निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले ह्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाला लाभली आहे.   
आपल्या सैनिकांचा दैदीप्यमान इतिहास नवीन पिढीला कळवा याजसाठी है अट्टहास.
भारताची सामरिक सिद्धता आणि Indian Military  Dogs या विषयी माहिती देण्यात आली आहे.

Image may contain: 5 people  Image may contain: 7 people, people standing and indoor


पुस्तक  समारंभ कारगिल विजय दिवस २६ जुलै २०२९ रोजी निवृत्त एअर मार्शल नितिन वैद्य आणि कर्नल श्रीराम पेंढारकर यांच्या हस्ते ;करण्यात आले. 

www.vivisudehra.com

कुणाल सुतावाणे 

9819504020


  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English