फक्त आणि फक्त आदिवासी संगीताचा ध्यास ..

फक्त आणि फक्त आदिवासी संगीताचा ध्यास .. 

एक नाही दोन नाहीतर तब्बल ५०-५५ वाद्य वाजविणारा एक अवलिया. अजून माझी आणि त्याची भेट नाही झाली, पण इंटरनेट च्या महाजाला मध्ये तो मला भेटत गेला. कधी त्या live session मध्ये तर कधी YOU TUBE च्या अनेक व्हीडीओ मधून तो मला दिसत राहिला. आणि मग नंतर त्याच्या माझ्या भ्रमणध्वनीवर गप्पा सुरु झाल्या. दोघांचा विषय एकच असल्यामुळे (अर्थात ईशान्य भारत) गप्पांमधून मला त्याचा प्रवास उलगडत गेला.

 

नाव – मधुर पडवळ.

ध्यास – FOLK MUSIC - आदिवासी लोकसंगीत आत्मसाद करायचे. नवीन संगीत शिकायचे आणि त्या नामशेष होऊ नये म्हणून त्या जतन करून ठेवायचे.

स्वतःचे FOLKS – WAGON नावाचे YOU TUBE channel.

 

गेल्या ६-७ वर्षापासून मधुर ईशान्य भारतमध्ये भ्रमंती करत आहे. तिथले लोकसंगीत शिकायचे आणि त्यांचे ते वाद्य घेऊन यायचे. आदिवासी लोकसंगीत शिकायचे हा एकच ध्यास घेऊन तो परत परत त्या भागात फिरत राहिला. आजच्या दिवशी हा तरुण ईशान्य भारतातले १६ वाद्य वाजवू शकतो. तो सांगत होता कि एका वाद्याची माहिती जाणून घ्यायचीअसेल तर तिथे त्या भागात एका वेळेला १५ – २० दिवस राहावे लागते. तेथील लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. परत भाषेची अडचण तर असतेच. आपली स्वतःची ओळख पटवून दिल्याशिवाय पुढे काहीच हालचाल घडत नाही. ईशान्य भारतातील अनेक महोत्सवांना त्याने भेटी दिल्या आहेत.

 

आसाम मधील तो ९ वाद्यांचा त्याने आतापर्यंत आभास केला आहे.

तो पेपा (म्हशीच्या शिंगापासून बनविलेले वाद्य), गोगोना (बिहू संस्कुतीचे हे वाद्य – एक महत्वाचे वाद्य), झुतुलि (रंगोली बिहू महोत्सव मध्ये वापरले जाते), आसामी दोतारा, आसामी नगारा (माजुली भागातील वाद्य), आसामी खोल (मृदुंग), आसामी खांम, डोबा आणि सेरजा ( बोडो आदिवासींची वाद्य) वाद्य वाजवू शकतो.

 

अरुणाचल प्रदेश – इलू ( आपतानी आदिवासींचे हे वाद्य) आणि पोनू योक्सू

 

nagaland मधील जेम्जी (मिथुन प्राण्याच्या शिंगापासून बनविलेले वाद्य) आणि ताटी ( एकच तार असलेले वाद्य) – अंगामी आदिवासींचे हे वाद्य

 

मेघालय मधील काई-दोतारा वाद्य (खासी आणि जयंतिया हिल्स मधील आदिवासींचे हे वाद्य)

 

मणिपूर मधील पेणा (मितीई आदिवासीचे वाद्य) आणि सारिंदा वाद्य

 








सिक्कीम मधील मादल, सारिंदा अथवा सारंगी - (हे वाद्य कुठेतरी नेपाली संस्कुतीशी मिळतेजुळते आहे.)

 

जेव्हा त्याचे व्हिडिओ बघत / ऐकत असताना प्रत्येक वाद्याचे स्वतंत्रपण जाणवत होते. आणि त्याने ते जपले आहे स्वतःचे आयुष्यसोबत इतरांचेहि आयुष्य सुंदर करण्याकरिता. अहो.. याला साथ देणारे मित्र/मैत्रिणी म्हणजेच हि सुरेल वाद्य..!!

 

२०१६ मध्ये दिल्ली येथे झालेल्या songs & dances of North East या कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समोर live concert मध्ये आपली कला सादर केली.

 

आदिवासी संगीत हा एक महासागर आहे. त्याचा प्रसार आणि त्यांचे संवर्धन करणे हि एक काळाची गरज आहे. संगीत शिकायचे म्हणजे कधी संपणारी हि विद्या आहे. आपल्या भारतामध्ये २९ राज्ये त्यातील असंख्य आदिवासी जाती आणि त्यातही परत त्यांच्या अनेक उप जाती हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली कि त्याला सर्व काही शिकायचं आहे पण त्यासाठी हा एक जन्म अपुरा पडेल अशी त्याला भीती वाटते.

 

याशिवाय तो बंगाल, राजस्थानी - मारवाडी, हिमाचल, आफ्रिकन, युरोपिअन, दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व आमराती देशातील काहीशी तर्की पद्धतीची अनेक वाद्य तो वाजवतो.

 

नुकताच २०१८ साली त्याला शाहीर साबळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत. आपल्या मुंबईत मध्ये राहतो .. एकदा जरूर भेट घ्या त्याची. आदिवासी वादयांमध्ये रमणारा एक अवलिया - मधुर पडवळ. 


 

तर संगीत म्हणजे काय हो..??

संगीत मधून ‘त’ काढला तर राहतो “संगी” म्हणजे मित्र/मैत्रीण.

संगीत मधून ‘गी’ काढला तर राहतो “संत”

आणि ‘सं’ काढला तर राहते “गीत” .. म्हणजेच एक असा मित्र, जो संत म्हणजे चांगला असावा, ज्याच्यामुळे जीवनात गीतांची बहार असेल; हेच आहे “संगीत”.

संगीत काय भन्नाट आहे ना... ते ऐकायलाच हवे.

दु:खात ऐकलं कि दु:ख कमी होते आणि सुखामध्ये ऐकले कि सुख अजून वाढते.


कुणाल सुतावणे

९८१९५०४०२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख