Indonesia - Prabnan

इंडोनेशिया -"प्रबंनन"


तसं बघायला गेल्यास इंडोनेशिया या देशाचे नाव ऐकल्यावर एक गोष्ट नेहमी आठवत असेल ते म्हणजे तिथे कायम घडणारे भूकंप. बऱ्याच वेळेला सुनामी आणि ज्वालामुखी तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. इंडोनेशिया हा देश १७५०५ बेटांचा समूह आहे.  त्यापैकी ३०० बेटांवर अजिबातच वस्ती नाही.

इथे असलेले योग्यकर्ता राज्य १७५५ मध्ये स्थापन झाले. तसे राज्य म्हणजे पूर्वीचे अयोध्यकर्ता. अयोध्या हे रामयणातील  प्रसिद्ध राज्य. कर्ता म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट. इथे इंडोनेशिया मध्ये ७५ % मुस्लिम लोकसंख्या आहे आणि उरलेल्या २५% मध्ये कैथेलिक, हिंदू, बौद्ध यांचा समवेश आहे. असेही असले तरीही इथे हिंदूची आणि बौद्धांची मंदिरे बरीच आहेत.

Prambanan Temple Tour - Tour

योग्यकर्ताच्या जवळच प्रबंनन आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे.  बोरोबुदुर पार्क मध्ये असलेल्या बुद्ध मंदिराला किंवा हिंदू वस्तुविशारद कुठेही मागे नाही हे दाखविण्यासाठी ९व्या शतकात राकइ पिकटन राजाने प्रबनन हिंदू मंदिर बांधले. या मंदिराचा आवर इतका मोठा आहे की त्याचा आवर हा १७ किमी  मध्ये पसरला आहे. यामध्ये एकूण २४० देवळे  आहेत. भिंतीच्या आत १६ व पलीकडे २२४ मंदिरे आहेत. त्यांना प्रवरा म्हणतात. इथे मुख्य मंदिर आहे ते ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे - त्रिमूर्ति देऊळ म्हणून इथे ते प्रसिद्ध आहे. त्यामध्ये महेशाचे - शिवाचे मंदिर सर्वात उंच आहे. त्याची उंची ४७ मी. इतकी आहे. शिवाचे मंदिर दिसण्या आधी जे मंदिर आपल्याला दृष्टीस पड़ते ते म्हणजे वाहन मंदिर. जे मंदिर नंदी, गरुड़ आणि राजहंस यांची आहेत.

Checking Out Prambanan Temple - Up in the Nusair

इंडोनेशियन भाषेमध्ये या मंदिराला "रोरो जोंगग्रांग" असे संबोधले जाते. निरनिराळ्या भूकंपात या देवळांची खुप मोठी हानी झाली. पण इंडोनेशियन सरकारने त्यांच्या पुनर्बांधणीचे काम जोरात चालू केले आहे. त्यांचे दगड केव्हाही कोसळू शकतात म्हणून काहीसा मंदिराचा भाग आजच्या तारखेला बंद करूँ ठेवला आहे. १९९१ साली
प्रबंनन या मंदिराला UNESCO ने WORLD HERITAGE चा दर्जा दिला आहे. इथली भिंतींवरील कलाकुसार ही रामयणतील काहीशा प्रसंगाची साक्ष ठेवतो. योग्यकर्ताच्या सुलतानाचा छोटा पॅलेस ही पाहण्यासारखा असून इथल्या प्रवासामध्ये बाटिक प्रिंट्स, चांदीची विविध उत्पादने करणाऱ्या कारखान्यांना भेट द्यायलाच हवी.

योग्यकर्ता शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या माउंट मेरापी हा  ज्वालामुखी २००४, २००६, २०१०, २०१८ आणि १० एप्रिल २०२० साली जागृत झाला. त्याचबरोबर मोठा विध्वंस झाला. याच मुळे प्रबंनन हिंदू मंदिराचे सुद्धा बरेच नुकसान झाले.

याच्या जवळील असलेल्या"बोरोबुदुर" मंदिराची माहिती पुढील blog मध्ये. 

धन्यवाद 
कुणाल सुतावणे 
९८१९५०४०२० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"PARAM VIR CHAKRA" - English

पर्यटन एक नशा ... ओळख