पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 ईशान्येकडील ७ पदभ्रमण/ऑफ बीट ठिकाणे... सौंदर्याने नटलेले, पृथ्वीवरील स्वर्ग जो आपल्याला इथेच भासतो असे ईशान्येकडील ही राज्ये. निसर्गाचे वरदान इथे आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे चमत्कार म्हणूनच निसर्ग माणसाला इथे येण्यासाठी साद घालत असतो. बऱ्याचवेळा म्हटले जाते....७ सिस्टर्स (आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिझोराम, माणिपूर, त्रिपुरा आणि १ ब्रदर - सिक्कीम. अर्थात पूर्वांचल च्या सप्त भगिनी आणि 1 भाऊ   सुरुवात त्या ब्रदर पासूनच करूया. १. नथु ला पास आणि त्सो ल्हामो लेक सिक्किम.        जिथे जाण्यासाठी हवामानाची आणि सरकारी यंत्रणेची, त्याचबरोबर शरीराची स्वास्थ्याची परवानगी घ्यावी लागते. याच्या पलीकडे चीन तिबेट ची सीमारेषा. म्हणूनच सोबत आपले सरकारी ओळखपत्र (govt ID) जवळ ठेवावे लागते. सिक्कीम ची राजधानी गंगटोक पासून ५५ किमी वर असलेले हे ठिकाण नथु ला पास आणि ३५ किमी वर त्सो ल्हामो लेक ४३१० मी. उंचीवर असलेले हे नथु ला पास. आजूबाजूला फक्त बर्फाच्या राशी आणि कायम आकाशातून  भुरभुरणारा बर्फ अंगावर पडत असतो.जसा जसा पुढे जात असतो. सीमेवरील जवानांचे अस्तित्व किती जोखमीचे आहे याची जाणी